उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक

हे आरोपी मुंबईच्या या उच्चभ्रूवस्तीत फिरून तिथल्या दुकांनाची किंवा घरांची रेकी करत होते. घरे किती वाजता बंद होतत? सीसीटीव्ही लावले आहेत का? पोलिसांची गस्त किती वेळ असते ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच हे आरोपी बंद घरात घरफोडी करत आले

उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक
SHARES

मुंबईतल्या खार, वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या उच्चभ्रू परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत आरोपींना खार पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. किशोर पवार उर्फ बंटी व राहुल गुरव अशी या दोघांची नावे आहेत न्यायालयाने या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.


सापळा रचून अटक

 पोलीस तपासत हे आरोपी मुंबईच्या या उच्चभ्रू वस्तीत फिरून तिथल्या दुकांनाची किंवा घरांची रेकी करत होते. घरे किती वाजता बंद होतात?  सीसीटीव्ही लावले आहेत का? पोलिसांची गस्त किती वेळ असते ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच हे आरोपी बंद घरात घरफोडी करत आले होते. खार परिसरात एका गुन्ह्यात या दोघांचे सीसीटिव्ही पोलिसांच्या हाती लागले. त्या अनुषंगाने खार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत त्यांनी तब्बल २०  गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यातील १४ गुन्हे खार परिसरात जुहूत २ आणि वांद्रे येथे ४ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.


३ कोटींचा ऐवज हस्तगत

या आरोपींना या पूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटून ही टोळी मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. अटक आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ३ कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने, मोबाइल, घड्याळ अशा वस्तू हस्तगत केल्या आहेत.



हेही वाचा -

सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा