सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीचे भाऊ आणि वहिणी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत होते. त्यांच्याकडे राहण्यासाठी ती मुंबईत आली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असं घरी सांगून बाहेर पडली.

सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली
SHARES

मुंबईत काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात चार नराधमांनी जालन्यातील मुलीला शीतपेयातून गुंगीचं औषध देत अत्याचार केले होते. या घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली होती. तिच्यावर औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचार सुरू होते. महिनाभराच्या मरण यातना भोगणाऱ्या तरुणीची मृत्यूची झुंज अखेर संपली. बुधवारी या मुलीचा मृत्यू झाला.


रक्तस्त्रावामुळे प्रकृती नाजूक

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीचे भाऊ आणि वहिणी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत होते. त्यांच्याकडे राहण्यासाठी ती मुंबईत आली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असं घरी सांगून बाहेर पडली. यानंतर चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीच्या कमरेखालचा भाग पूर्णतः निकामी झाला. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अधिक नाजूक होती. मात्र, नराधमांनी दिलेल्या धमक्यांमुळे भेदरलेल्या पीडितेने अत्याचाराची माहिती नातेवाईकांना आणि पोलिसांना दिलेली नव्हती. दरम्यान, तिची प्रकृती जास्तच खालावली. यानंतर तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही बाब तिच्या आई-बाबांना सांगितली. यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा तिने अत्याचाराची माहिती दिली. 


 गुन्हा चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग 

त्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला होता. २५ जुलैपासून सुरू असलेल्या उपचारांना पीडितेचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नांनाही यश आलं नाही. तिला या घटनेचा मानसिक धक्काही बसला होत अखेर बुधवारी तिची प्राणज्योत मालावली.



हेही वाचा -

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक महामार्ग पोलिस सज्ज

जे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा