जे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय


जे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
SHARES

ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा किंवा या कटाची पूर्ण माहिती असल्याचा कुठलाही थेट पुरावा नसल्याने पत्रकार जिग्ना वोराची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. 

थेट सहभागाचा पुरावा नाही

न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने जिग्नाच्या सुटकेविरोधात पोलिसांनी केलेल्या अपिलावर सुनावणी घेतली. या सुनावणीत जिग्ना आणि राजन यांच्यातील फोनवरील संभाषण तसंच इतर पुराव्यांतून तिने राजनला भडकावल्याने डे यांची हत्या झाल्याचं सिद्ध झालं नाही. तसंच राजनने देखील न्यायालयीन अधिकारी वा न्यायालयासमोर आपल्या गुन्ह्य़ाची कबुली  दिलेली नाही. त्यामुळे जिग्नाचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा थेट पुरावा पुढे आलेला नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. 

निर्दोष सुटका

गेल्या वर्षी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याच्यासह ९ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेप सुनावली होती. तर पत्रकार जिग्ना आणि पॉल्सन जोसेफ या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. जे.डे. यांच्या विरोधात राजनला भडकावल्याचा प्रमुख आरोप जिग्नावर लावण्यात आला होता. परंतु न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केल्यावर पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं.हेही वाचा-

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ

गांजा तस्करीप्रकरणी दोघांना अटकRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा