ओशिवरात नैराश्येतून माॅडेल तरूणीची आत्महत्या

पर्ल पंजाबी या स्ट्रगलिंग माँडेलसोबत घडली आणि नैराक्षेतून तिने गुरूवारी रात्री आत्महत्या केली. ओशिवरा येथील लोखंडवाला परिसरातील केन वूड सोसायटीतीत मागील अनेक महिन्यांपासून पर्ल ही रहात होते. कुठल्याही चित्रपटात काम मिळवण्यासाठी ती धडपडत होती.

ओशिवरात नैराश्येतून माॅडेल तरूणीची आत्महत्या
SHARES

मुंबईच्या ओशिवरा परिसरात एका स्ट्रगल करत असलेल्या माॅडेलने नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. पर्ल पंजाबी असं या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.


इमारतीच्या गच्चीवरून उडी

चित्रपटाबरोबरच दूरचित्रवाहिन्यांचा वाढता पसारा यामुळे कलाकारांना व्यापक व्यासपीठ निर्माण झालं आहे. यशस्वी अभिनेता होण्यासाठी देशातील विविध राज्यातील खेडोपाड्यातून अनेक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईला येतात. अनेकांना मायानगरी भरभरून देते तर दुसरीकडे अनेकांचं करिअरही विस्कळीत होतं. या स्ट्रगलिंगच्या नैराश्यापायी अनेकांनी मृत्यूला देखील जवळ केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. अशीच काही घटना पर्ल पंजाबी या माॅडेलसोबत घडली आणि नैराश्येतून तिने गुरूवारी रात्री आत्महत्या केली. ओशिवरा येथील लोखंडवाला परिसरातील केन वूड सोसायटीत मागील अनेक महिन्यांपासून पर्ल राहत होती. कुठल्याही चित्रपटात काम मिळवण्यासाठी ती धडपडत होती. मात्र, जागोजागी तिच्या पदरात निराशाच पडली. काम मिळत नसल्यामुळे पर्लने अखेर इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली.  


घरातल्यांशी वाद

पर्लने केलेल्या आत्महत्येची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी ओशिवरा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वारंवार येत असलेल्या अपयशामुळे घरातल्यांनी तिला अभिनयाचा नाद सोडण्यास सांगितला होता. यावरून घरातल्यांसोबत झालेल्या वादातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं कळतं. पोलिस अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.हेही वाचा  -

सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली

उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा