मुंबईत थर्टीफस्टआधीच १ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त

दक्ष असलेल्या मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान पोलिसांनी हॉरर ड्रग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या १०० किलो फेन्टानिल ड्रग्जसह चौघांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत १ हजार कोटी रुपये एवढी आहे.

मुंबईत थर्टीफस्टआधीच १ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त
SHARES

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, मुंबईतील नशेच्या सौदागरांनीही आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. परंतु दक्ष असलेल्या मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान पोलिसांनी हॉरर ड्रग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या १०० किलो फेन्टानिल ड्रग्जसह चौघांना अटक केली आहे. सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि घनश्‍याम सरोज अशी आरोपींची नावे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत १ हजार कोटी रुपये एवढी आहे.


कुठे सापडलं ड्रग्ज?

कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरात काही जण फेन्टानिल ड्रग्जच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती 'एएनसी'च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी २ संशयित आरोपी हे टाटा नेक्‍सा गाडीत २५ किलो वजनाचे ४ डबे उतरवून दुसऱ्या गाडीत ठेवत होते. या दोघांच्या हालचालीवर पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्या डब्यात फेन्टानिल नावाच्या ड्रग्जचा साठा असल्याचं दिसून आलं.


आरोपी ताब्यात

यावेळी संदीप तिवारी आणि गाडी चालक घनश्याम सरोज या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संदीप हा मार्केटींग कंपनीत उच्च पदावर कामाला आहे. पोलिस चौकशीत हे ड्रग्ज १०० किलो वजनाचं असून त्याची बाजारात किंमत १ हजार कोटीहून अधिक असल्याचं स्पष्ट झालं.


अमेरिकेत १६ हजार जणांचा मृत्यू

सरत्या वर्षाला निरोप देताना मुंबईत होणाऱ्या पार्ट्यांमध्ये हे ड्रग्ज पुरवण्यात येणार होतं.
सोबतच या ड्रग्जची परदेशातही निर्यात होणार असल्याचं दोघांच्या चौकशीतून पुढे आलं. फेन्टानिल हे ड्रग्स इतके घातक आहे की, या ड्रग्सच्या अतिसेवनामुळे अमेरिकेत १६ हजार व्यक्तींचा मृत्यू झाला होता. हे ड्रग्स ओपिओईड या नावानेही प्रसिद्ध आहे.

या ड्रग्सच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत आहे. या ड्रग्ज तस्करीसाठी वापरण्यात आलेली कार ही प्रदीप तिवारी नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोणाला संशय येऊ नये यासाठी या महागड्या गाडीचा वापर करण्यात येत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा