जमिनीच्या वादावरून दहिसरच्या बार मालकाला मारहाण

 Borivali
जमिनीच्या वादावरून दहिसरच्या बार मालकाला मारहाण

बार मालकाचे अपहरण करून काहींनी त्यांना इन्होवा कारमध्ये बसवलं आणि बोरीवलीच्या ऋषीवनमध्ये नेत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीचे नाव रितिक पटनायक असं असून दहिसरमधील संभाजीनगरमध्ये ते बार चालवतात.

जखमी बारमालकाला कंदिवाली (प.) इथल्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रितिक पटनायक हे भायंदरमधले रहिवासी आहेत. त्यांचं प्रभाकर पवार नावाच्या व्यक्तीसोबत जमिनीवरून वाद सुरू होते. मात्र 9 एप्रिलला पवारने बारमालक पटनायक यांना संभाजीनगरच्या लिंक रोड येथे बोलावलं आणि साथीदारांच्या मदतीने पटनायक यांचं अपहरण करत इन्होवा कारमध्ये बसवलं. पुढे त्यांना बोरीवलीच्या ऋषीवनात नेऊन त्यांना मारहाण केली आणि पळ काढला. काही वेळानंतर यासंदर्भाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पीडित पटनायक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Loading Comments