मानखुर्दमध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे

 Mandala
मानखुर्दमध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
मानखुर्दमध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
See all

मुंबई - संकटाचा सामना महिलांनी कसा करावा, यासाठी रविवारी मानखुर्दमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. मानखुर्दच्या मोहिते पाटीलनगरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी पोलिसांनी महिलांना स्वरक्षणासाठी काय केलं पाहिजे यावर मार्गदर्शन केलं. तसंच समाजातील अपप्रवृत्तींकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिसांना माहिती देण्याबाबत संकोच बाळगू नका, पुढे येऊन तक्रार करा. तरच महिला अधिक सुरक्षित राहतील असं मत मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नरेश कासले यांनी या वेळी मांडलं. या कार्यक्रमात परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला.

Loading Comments