सावधान ! सरकारी नोकरीचे आमीष दाखवून ४०० जणांची फसवणूक


सावधान ! सरकारी नोकरीचे आमीष दाखवून ४०० जणांची फसवणूक
SHARES

मुंबईत बेरोजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमीष दाखवून त्यांना लुबाडून त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या टोळीचा मुंबईच्या प्राँपर्टी सेलने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणडे फसवणूक करणाऱ्यांमध्ये पालिकेतील एक निवृत्त कर्मचारी, पालिकेत कार्यरत असणारा कर्मचारी आणि पोलिस दलातून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या महिलेचा समावेश आहे.

हेही वाचाः- भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी

मुंबईच्या अ‍ॅण्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या आणि शिवणकाम करणाऱ्या एका महिलेला तिच्या मुलास पालिकेत चतुर्थ श्रेणी विभागात कामाला लावतो. असे आमीष प्रकाश सदाफुले आणि नितीन धोत्रे या दोघांनी दिले. पालिकेच्या पाणीखात्यात नोकरी मिळणार असल्याने या महिलेने खर्च करण्याची तयारी दर्शवली. महिलेने कसेबसे करून चार लाख रुपये जमविले आणि या दोघांना टप्प्याटप्प्याने दिले. पैसे देऊन बरेच दिवस झाले, तरी नोकरीबाबत पुढे काहीच होत नसल्याने या महिलेने दोघांशी संपर्क साधला. त्यावेळी या दोघांनी त्यांना नवे कारण सांगितले. महापालिकेत नोकरीसाठी वैद्यकीय तपासणी गरजेची असल्याचे सांगून दोघांनी या महिलेच्या मुलास रुग्णालयात बोलाविले. यानंतर दोघांनी नियुक्तीपत्र दाखवून पालिका मुख्यालयातून कामावर हजर राहण्याबाबत नंतर कळविण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचाः- मुंबईत २२-२३ डिसेंबरला पाणी कपात

प्रकाश सदाफुले आणि नितीन धोत्रे यांनी सांगितल्यानुसार ही महिला आणि तिचा मुलगा पालिका मुख्यालयातून फोन येण्याची वाट पाहत होते. बराच कालावधी उलटल्यानंतरही काहीच माहिती मिळत नसल्याने महिलेने दोघांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे मोबाइल बंद होते. महिला आणि तिच्या मुलाने या दोघांचे घर शोधून काढले. त्यावेळी या दोघांनी अशाप्रकारे अनेकांना फसविल्याचे त्यांना कळले. आपली देखील फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांनी सायन पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, नाशिकच्या तरुणांकडूनही पैसे घेऊन त्यांची या दोघांनी फसवणूक केली आहे. आतापर्यंत या टोळीने तब्बल ४०० जणांची फसवणूक केली असल्याची माहिती प्राँपर्टी सेलच्या अधिकार्यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा