दुरवस्था पोलीस चौकीची

 Mitaghar
दुरवस्था पोलीस चौकीची
दुरवस्था पोलीस चौकीची
दुरवस्था पोलीस चौकीची
See all

मिठाघर - आपण जी पाहत आहात ती कोणतीही झोपडी नाही... हे कोणतंही पत्र्याचं घर नाही... तर ती आहे, चक्क एक पोलीसचौकी. मुलुंडमधील मिठागर परिसरातील व्ही. पी. एम. महाविद्यालयाच्या शेजारील नवघर पोलीस ठाण्यांतर्गत असलेली ही आहे पोलीसचौकी क्रमांक 2. आसपास साचलेला कचरा, गंजलेले पत्रे, स्वच्छतागृहाची गैरसोय अशी या चौकीची सध्याची परिस्थिती. या पत्र्याच्या चौकीत पोलीस कसंं काम करू शकतात? असा सवाल इथले स्थानिक विचारत आहेत. इथे जवळच दोन महाविद्यालय आहेत. तसंच इथे मोठ्या संख्येन लोकवस्ती असल्यानं चौकी जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. ही पोलीसचौकी फार जुनी, पण तरीही तात्पुरत्या बांधकामावर आहे. ही पोलीसचौकी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अजिबात सोयीची नाही, अशी माहिती तिथल्या स्थानिक पोलिसांनी दिली. ती चौकी पक्क्या भिंतीची तरी असावी अशी अपेक्षा स्थानिक करत आहेत.

Loading Comments