आईच्या हत्येपूर्वी सिद्धांत करणार होता आत्महत्या


आईच्या हत्येपूर्वी सिद्धांत करणार होता आत्महत्या
SHARES

आपल्याच आईची हत्या करून तिच्याच रक्ताने कबूलनामा लिहिणाऱ्या सिद्धांत गणोरेने त्याच्या अटकेनंतर अनेक खुलासे केले आहेत. आईची हत्या करण्याआधी मी आत्महत्या करणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. आईच्या सततच्या कटकटीने त्रस्त असलेल्या सिद्धांतने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक त्याने विचार बदलला आणि स्वतःच्या जागी आईवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

सांताक्रुजच्या प्रभात कॉलनीत राहणाऱ्या गणोरे कुटुंबात सतत भांडणे होत होती. ज्ञानेश्वर गणोरे हे पोलीस खात्यात असल्याने ते घरी जास्त वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या घरी नेहमीच वाद होत असत. त्यांची पत्नी दीपाली गणोरे ही सतत तिला वेळ न दिल्याने त्यांच्याशी भांडत असे, तसेच त्यांच्यावर संशय देखील घेत असे.

घरात सतत होणाऱ्या भांडणाचा परिणाम हा शेवटी त्यांचा मुलगा सिद्धांत याच्यावर देखील झाला. 10 वीमध्ये 92 टक्के गुण मिळवणारा सिद्धांत इंजिनिअरिंगला घातल्यावर नापास होऊ लागला. इंजिनिअरिंगमध्ये सतत तीन वर्ष नापास झाल्यावर त्याला आईने सायन्सला घातले. पण तिथे देखील काही वेगळे झाले नाही. यावर्षी झालेल्या वार्षिक परीक्षेला सिद्धांत बसलाच नाही. आईच्या त्रासाला सिद्धांत अाधीच कंटाळला होता. त्यात त्याचे कुणीच मित्र नसल्याने तो घरीच एकटाच असे. त्यात आईच्या अशा वागण्याने त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडण्यास सुरुवात झाली होती.


हेही वाचा -

सिद्धांतनेच केली आईची हत्या, दीपाली गणोरे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा


हत्येच्या काही दिवसांपूर्वीच सिद्धांतचा एफवाय बीएससीचा निकाल लागला होता. परीक्षेला न बसलेल्या सिद्धांतला आपला निकाल माहीत होताच. त्यात त्याची आई त्याच्यासोबत रिझल्ट घेण्यासाठी येणार असल्याने त्याची धाकधूक वाढली होती. सुरुवातीचे काही दिवस त्याने आईला टाळले. मात्र 23 तारखेचा दिवस आला आणि त्याची धाकधूक अधिकच वाढली. आई रिझल्टला येणार म्हणून सिद्धांत तणावात होताच. यामुळे आत्महत्या करण्यासाठी त्याने चाकू देखील हातात घेतला. पण तितक्यात पुन्हा त्याला आई काहीतरी कारणावरून ओरडली. या गोष्टीचा त्याला राग आला. आपण का मरायचे? असे त्याला वाटू लागले आणि त्याने स्वतःला मारण्यासाठी घेतलेल्या चाकूने आईच्या गळ्यावर तब्बल 9 वार केले. तिची हत्या केल्यानंतर तिच्याच रक्ताने एक नोट लिहिली. tiered of her catch me and hang me आणि पुढे एक स्माइली देखील काढली. त्यानंतर त्याने आंघोळ केली आणि कपडे बदलून घरातील 2 लाख रुपये घेऊन बाहेर पडला.

जोधपूरवरून सिद्धांतला अटक करून शुक्रवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. जिथे कोर्टाने पुढील तपासासाठी त्याला 2 जूनपर्यंत वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा