सिद्धांतनेच केली आईची हत्या, दीपाली गणोरे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा


सिद्धांतनेच केली आईची हत्या, दीपाली गणोरे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
SHARES

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा अखेर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मुलानेच म्हणजे सिद्धांत गणोरे यानेच त्याच्या आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सिद्धांत गणोरेला पोलिसांनी जोधपूरहून अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात सिद्धांतने आपणच आपल्या आईची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. 

उदयनगर पोलीस ठाण्यात माध्यमांना सिद्धांतने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, आई-वडिलांच्या रोजच्या भांडणाला आपण कंटाळूलो गेलो होतो. त्यामुळेच आईची हत्या केल्याचं त्यानं जोधपूर पोलिसांना सांगितलं. एवढंच नाही तर त्याच्या आईला वाटायचे की, सगळे तिच्या विरोधात कट रचत आहेत. या सगळ्याला कंटाळून त्याने आपल्या आईची चाकूने हत्या केल्याचंही त्याने म्हटले आहे.


हेही वाचा - 

पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची क्रूर हत्या; घटनेनंतर मुलगाही बेपत्ता


बहुचर्चित शीना बोरा हत्येचा तपास करणारे अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची मंगळवारी संध्याकाळी हत्या झाली होती. आई दीपाली गणोरे हिची हत्या करून सिद्धांत पसार झाला होता. घरातील जवळपास दीड लाख रुपये घेऊन वेगवेगळ्या ट्रेन बदलत तो जोधपूरला पोहोचल्याचंही तपासात समजतंय. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर त्याने फरशीवर आपल्याच आईच्या रक्ताने 'tired of her, catch me and hang me' असं लिहून पुढे एक स्माईली काढल्यानं चांगलीच खळबळ उडाली होती.

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक गणोरे यांचा मुलगा जयपुरला गेल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ फ्लाइटने तीन ऑफिसरची टीम ही जयपूरला रवाना झाली. पण तिथे पोहोचल्यावर तो  जोधपूरला गेल्याचं आम्हाला समजलं. जयपूर आणि जोधपूर यातील अंतर हे 7 तास असल्यानं आम्ही जोधपूर पोलिसांची मदत घेतली. मुलाचा फोटो त्यांच्याशी शेअर केला आणि त्यांना हॉटेलची झडती करण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्यांनी हॉटेलची झडती घेतल्यानंतर सिद्धांतला ताब्यात घेतले.


रश्मी करंदीकर , प्रवक्त्या, मुंबई पोलीस

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घरातील चाकूने सिद्धांतने आपल्या आईच्या गळ्यावर 9 ते 10 वार केले. हत्या करून आईच्याच रक्ताने जमिनीवर लिहून झाल्यावर त्याने घरात आंघोळ केली आणि नंतर पैसे घेऊन तो पसार झाला. ज्यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे घरी आले. तेव्हा पत्नी दिपाली त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. सांगितलं जातंय की, सिद्धांत याला सुरुवातीला इंजिनिअरिंगला घालण्यात आले होते. जिथे तो तीन वेळा नापास झाला. त्यानंतर त्याला नॅशनल कॉलेजमध्ये सायन्सला घालण्यात आलं. पण तिथे देखील तो नापास झाला. त्याच्यासोबत असलेली मुलं इंजीनिअर झाली होती. याचा देखील तणाव त्याच्यावर असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा