अल्पवयीन मुलीशी चाळे, चालक अटकेत


अल्पवयीन मुलीशी चाळे, चालक अटकेत
SHARES

शिर्डी ते मुंबई खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या बेस्ट बस चालकास गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

कुरार परिसरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. १३ जून रोजी ही मुलगी आपल्या कुटुंबिसांसह शिर्डीला गेली होती. शिर्डीहून मुंबईला ते खासगी ट्रॅव्हल्सने येत होते.  यावेळी मुलीची आई मुलीला मागच्या सीटवर बसवून स्वत: पुढे बसली. संगमनेर बस थांब्यावर चढलेला आरोपी पीडित मुलीच्या बाजूला बसला. त्यावेळी त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. मात्र, भितीपोटी मुलीने कुणालाही काही सांगितले नाही.


खबऱ्यांकडून माहिती

मालाड येथील घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार कुरार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. कालांतराने हा गुन्हा गुन्हे शाखा१२ कडे सोपवला.  पोलिसांना खबऱ्यांकडून तो आरोपी गोरेगाव बेस्ट बस डेपोमध्ये चालक असल्याचं समजलं.  पोलिस मागावर असल्याचे समजल्यावर अारोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.हेही वाचा -

अरमान कोहलीविरोधात प्रेयसीची तक्रार मागे

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बाॅम्बची अफवा


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा