विजेच्या झटक्याने बेस्ट कर्मचारी ठार

 wadala
विजेच्या झटक्याने बेस्ट कर्मचारी ठार
विजेच्या झटक्याने बेस्ट कर्मचारी ठार
See all

वडाळा - विजेचा धक्का बसल्याने एका बेस्ट कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वडाळा बस डेपोच्या भास्करवाडीत घडली आहे. संतोष लाड असे या व्यक्तीचे नाव असून तो परळ इथला रहिवासी होता. बुधवारी सायंकाळी संततधार पावसामुळे भास्करवाडीतील वीजप्रवाह खंडित झाला होता. स्थानिक रहिवाशांनी बेस्टच्या प्रभाग कार्यालयाला याची माहिती दिल्यानंतर संतोष वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तिथे आला. दरम्यान त्याचा पाय घसरला आणि केबिनमधील हाय व्होल्टेज फ्युजवर पडला. त्यामुळे थेट विद्युतप्रवाहाशी संपर्क आल्याने तो जागीच ठार झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक चौकशी करून कोणताही संशय न बळावल्याने पोलिसांनी मृतदेह केईएम रुग्णालयात दाखल केला.

Loading Comments