दादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी

 Dadar
दादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी
दादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी
दादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी
दादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी
See all

दादर - दादरच्या राजा बधे चौकात सोमवारी बेस्ट बसला झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. बसची धडक एवढी भीषण होती की तो व्यक्ती लांब फेकला गेला. अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला. बसच्या कंडक्टरने जखमीला हिंदुजा रुग्णालयात भर्ती केलं आहे. डॉक्टरांनी त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी या आधी देखील तक्रारी केल्या होत्या, पण याकडे कोणीच लक्ष देत नसल्याची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे.

Loading Comments