धक्का देणाऱ्यांपासून सावधान!


SHARES

गर्दीत धक्का देणाऱ्यांपासून सावधान..कारण आता मुंबईत दे धक्का गँग सतर्क झालीय. जी गँग तुमच्या नजरेदेखत अगदी शिताफीने तुमचे पैसे चोरू शकते.

मुंबईतलं मनीष मार्केट...तुम्हाला नेहमीच इथे गर्दी दिसेल..पण याच गर्दीचा फायदा या दे धक्का गँगनं घेतला..आणि एका तरूणाला त्याच्या डोळ्यांदेखत 2 लाखांचा गंडा घातला.. या टोळक्याची मोडस ओपरांडी अतिशय चलाक..आधी या टोळीन आपलं लक्ष्य निश्चित केलं आणि मग त्या तरूणाला घेरलं. त्यानंतर सराईतपणे त्या तरूणाला धक्का मारून त्याचं लक्ष विचलित केलं. आणि हीच संधी साधत त्याच्या हातातली बॅग लंपास केली..काही कळायच्या आतच ही बॅग तिस-या व्यक्तीच्या हातात गेली आणि गायब झाली..शिवाय चोरणा-या व्यक्तीचा पाठलाग होऊ नये म्हणून इतर साथीदार रस्ता अडवायलाही लगेच तयार...त्यामुळे जर तुम्ही गर्दीतून प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे किंमती ऐवज असेल तर जरा सावध रहा...कारण गर्दीत तुम्हाला कधीही धक्का लागू शकतो...

संबंधित विषय