एटीएममधून पैसे काढताना चोरांपासून सावधान


SHARES

कांदिवली - एटीएममध्ये मदत करण्याच्या नावाखाली लुबडणाऱ्या टोळीपासून सावधान. कांदिवलीमध्ये अशा दोन घटना समोर आल्या आहेत. कांदिवलीतल्या हिंदुस्तान नाका जवळ स्टेट बँकेचे एक एटीएम आहे. या एटीएममध्ये सुकुरुल्लाह अब्दुल हाकिम शाह पैसे काढण्यासाठी गेले होते. पण मशीनमध्ये काही तरी बिघाड होता. त्यावेळी सुकुरुल्लाह अब्दुल यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला. पण त्याने हातचालखी दाखवत त्यांच्या एटीएम कार्डसोबत स्वत:च्या कार्डची अदलाबदली केली आणि त्यानंतर फरार झाला. शाह घरी गेल्यावर त्यांच्या एटीएममधून 20 हजार काढल्याचा मेसेज त्यांना बँकेकडून आला.

दुसरी घटना हिंदुस्तान नाका येथील एसबीआय बँकेच्या एटीएमची आहे. अभिषेक सिंह हे या एटीएममध्ये पैसे काढायला गेले होते. पण त्यावेळी मशीनचा सर्व्हर डाऊन होता. म्हणून त्याला एका तरूणाने मदत केली आणि पाच हजार रूपये काढून दिले. अभिषेक घरी गेल्यानंतर त्याच्या मोबाईल आणखी 5 हजार रूपये एटीएममधून काढल्याचा मेसेज आला. या घटनेतल्या दोघा पीडितांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. चारकोप पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा