चेंजिंग रूमच्या स्क्रूमध्येही असू शकतो छुपा कॅमेरा!

 Mumbai
चेंजिंग रूमच्या स्क्रूमध्येही असू शकतो छुपा कॅमेरा!
चेंजिंग रूमच्या स्क्रूमध्येही असू शकतो छुपा कॅमेरा!
See all

मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे असल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असाल. मात्र आता असे कॅमेरे आले आहेत ज्यांना पकडणे हे जवळपास अशक्य आहे. छोटेखानी स्क्रूमध्ये लपलेले हे कॅमेरे छोटे तर आहेतच, मात्र ते ओळखू येणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हॉटेलच्या रुममध्ये किंवा चेंजिंग रुममध्ये कुठे काही ब्लिंक तर होत नाही ना? याची काळजी महिलांनी घ्यायला हवी असं नावाजलेल्या गुप्तहेर रजनी पंडित यांनी सांगितलं.

दरम्यान 'आमच्यापर्यंत अद्याप अशा स्क्रू कॅमेऱ्याची तक्रार आली नसून, तक्रार आल्यास कारवाई जरूर केली जाईल' अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. टेक्नॉलॉजी एवढ्या झपाट्याने अद्ययावत होत आहे कि, उद्या कसला शोध लागेल याचा नेम नाही. आज हे कॅमेरे स्क्रूमध्ये लपवण्यात आले आहेत. उद्या ते आणखीनही सूक्ष्म होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये जात असाल तर सावध रहा.

Loading Comments