SHARE

भांडुप - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकानं जाहीर केल्यानंतर काळा पैसा व्हाईट करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली. अशाप्रकारे नागरिकांची आधारकार्ड घेऊन बॅंकेत गेलेल्या ३४ वर्षीय व्यापाऱ्याच्या भांडुप पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जयेश शांतीलाल जैन असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून आधारकार्डचा एक गठ्ठा आणि रबरी शिक्के जप्त केलेत. जैन यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

भांडुप पश्चिमेकडील एनकेजीएसबी बॅंकेमध्ये नोटा बदली करण्यासाठी जैन गेला होता. नोटा बदलण्यासाठी असलेले फार्म बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून घेऊन आधारकार्डच्या झेरॉक्सच्या आधारे तो पैसे बदलून घेऊ लागला. सकाळपासून त्याचा हा प्रताप सुरू होता. दुपारी चारच्या सुमारास त्यानं अनिरूद्ध तिवारी या नावाच्या आधारकार्डची झेरॉक्स पैसे बदलण्यासाठी बॅंकेत दिली. तिवारी हा बॅंकेचा नियमित ग्राहक असल्यानं बॅक कमर्चाऱ्यानं जैन हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी आल्याचं आळखलं. त्यांनी तात्काळ याची माहिती भांडुप पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजय कावळे यांनी जैन याला पकडून पोलीस ठाण्यात आणले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या