Advertisement

कमकुवत सुरक्षा रक्षकांची कार्यालयं होती नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर


कमकुवत सुरक्षा रक्षकांची कार्यालयं होती नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर
SHARES

नक्षली संबंधांच्या संशयावरून ज्या ५ डाव्या विचारवंतांवर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून मिळालेल्या दस्तावेजाच्या आधारावर नक्षलवाद्यांनी कमकुवत सुरक्षा असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची यादी बनवली होती. त्यापैकी ७ कार्यालयांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.


सरकार उलथवण्याचा कट

२९ ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरात ९ ठिकाणी छापे मारत नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून वरावर राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नन गोन्साल्विस यांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान आरोपींच्या घरासह कार्यालय अशा ९ ठिकाणी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, काॅम्प्युटर्स, लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या हाती आलेले ई-मेल, पत्रे आणि अन्य साहित्यातून मोठ्या षडयंत्राची माहिती समोर आली. या माहितीनुसार नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा विकत घेण्याचा, त्याद्वारे देशात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि केंद्रातील सरकार उलथवण्याचा कट होता.


सुरजागड येथे नक्षली हल्ले

या दस्तावेदातील एका पत्रात काॅम्रेड प्रकाश यांनी सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेल्या पत्रात कमकुवत सुरक्षा रक्षककांच्या ९ कार्यालयाची माहिती काढण्यात आली असून त्यांच्यावर हल्ले करून शस्त्रसाठा लुटण्याचा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामध्ये बसागुडा, कांदुर्ला, भेजी, महाराष्ट्रातील सुरजागड येथे नक्षली हल्ले करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement