कोरोनाचा फायदा उठवण्यासाठी फसवी जाहिरात, गुन्हा दाखल

कोरोना रोगाला रोखणारी गादी, अशी फसवी जाहिरात करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा फायदा उठवण्यासाठी फसवी जाहिरात, गुन्हा दाखल
SHARES

कोरोना रोगाला रोखणारी गादी, अशी फसवी जाहिरात करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अरिहंत नामक गादीवर झोपल्यास कोरोना विषाणूची लागण होत नाही अशी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. कोरोनाचा फायदा उठवण्यासाठी अशी खोटी जाहीरात करणाऱ्या कंपनीविरोधात भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात  आरोग्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील कशेळी आणि वळ या ग्रामपंचायत क्षेत्रातील अरीहंत मेट्रेस या विक्रेत्याने ‘अँटी कोरोना व्हायरस मेट्रेस’ ही 15 हजार रुपयांची गादी विक्रीस आणली. तसेच त्यावर झोपल्यास कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही अशी फसवी जाहिरात मुंबई समाचार या गुजराती दैनिकात 13 मार्चच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती.

या बाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब डावखरे यांची तक्रार घेऊन अरिहंत मेट्रेस चे मालक अमर पारेख यांच्या विरोधात भादवी कलम 505 [ 2 ( ब ) ] सह आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 चे कलम 52 व औषधी द्रव्य व तिलस्मी उपचार [ आक्षेपार्ह जाहिरात ] अधिनियम 1954 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या जाहिरातीला मुंबई ग्राहक पंचायतीच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी आक्षेप घेत ‘अ‍ॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया’ यांच्याकडे तक्रार केली. या कौन्सिलने तात्काळ दखल घेऊन जाहिरातदाराशी संपर्क साधला असता, आपण ही जाहिरात तत्काळ मागे घेत आहोत, असे कंपनीने कळविले.



हेही वाचा -

Coronavirus Updates: पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

Coronavirus : क्वारंटाईनचा सल्ला दुर्लक्षित करून चौघा तरूणांचा ट्रेनमधून प्रवास

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा