अंधेरीतील बड्या ड्रग तस्करला अटक


अंधेरीतील बड्या ड्रग तस्करला अटक
SHARES

अमली पदार्थ विरोधी (एएनसी) शाखेनं ड्रग्ज पेडलर म्हणजेच अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ओसी अँड्र्यू नावाच्या परदेशी नागरिकाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा लाख रुपयांचं कोकेनदेखील जप्त केलं आहे. अँड्र्यू हा अंधेरी परिसरातील एक नावाजलेला ड्रग पेडलर असून मागील अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी शाखा त्याच्या मागावर होती.


सापळा रचून अटक

शुक्रवारी अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या बॅक रोडवर अँड्र्यू हा ड्रग्जचा सौदा करायला येणार असल्याची माहिती एएनसीच्या वांद्रे युनिटला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री बॅक रोडवर सापळा लावण्यात आला. रात्री अँड्र्यू दिसताच त्याला एएनसीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११८ ग्रॅम कोकेन सापडलं. बाजारात या कोकेनची किंमत ५ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. मीरा रोडवर राहणारा अँड्र्यू हा लोखंडवाला परिसरातील मुख्य ड्रग्ज विक्रेता असल्याचा दावा एएनसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

अँड्र्यूला अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) या कायद्याखाली अटक करण्यात आली असून त्याला शनिवारी कोर्टात हजार करण्यात आले. यावेळी कोर्टानं त्याला २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा

ड्रग्ज तस्करीसाठी 'तो' वापरायचा यू ट्यूब


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा