ड्रग्स तस्करीसाठी 'तो' वापरायचा यू ट्युब

बकुलचं सेलिब्रिटींसोबतचं कनेक्शन उघड झालं असून दुसरीकडे ड्रग्ज पुरवण्यासाठी बकुलची कार्यपद्धती ऐकून अंमली पदार्थविरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. यांत सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे बकुल अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चक्क यू ट्युबचा वापर करायचा.

ड्रग्स तस्करीसाठी 'तो' वापरायचा यू ट्युब
SHARES

हाय प्रोफाइल ड्रग्स तस्कर बकुल चंदेरी याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे बकुलचं सेलिब्रिटींसोबतचं कनेक्शन उघड झालं असून दुसरीकडे ड्रग्ज पुरवण्यासाठी बकुलची कार्यपद्धती ऐकून अंमली पदार्थविरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. यांत सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे बकुल अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चक्क यू ट्युबचा वापर करायचा.


'असा' वापरायचा यू ट्युब

यू ट्युबवर हव्या असलेल्या ड्रग्सच्या सांकेतिक शब्दाचं नाव टाकून सर्च करायचं. त्यानंतर हे शब्द हॅश टॅग म्हणून वापरलेले जे ट्रान्स म्युझिक व्हिडियो समोर यायचे त्या व्हिडिओ कमेंटमध्ये चॅट करून हे अंमली पदार्थ विकायचे. याच ठिकाणी ड्रगची किंमत आणि डिलिव्हरी कुठे मिळणार हे सगळं ठरत असल्याचा संशय अंमली पदार्थविरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांना आहे.



सेलिब्रिटींसोबतचे फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी खारमध्ये बकुलला ८.५० लाख रुपयांचं कोकेन आणि ४ लाख रुपये किंमतीच्या एलएसडी डॉट्ससह अटक करण्यात आली होती. यावेळी बॉलीवूड मधील अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत बकुलचे फोटो पोलिसांच्या हाती लागले होते. बकुल अनेक बड्या सेलिब्रिटींच्या सतत संपर्कात असून त्यांना बकुलच अंमली पदार्थ पुरवत असल्याचा संशयही पोलिसांना आहे. त्याचबरोबर उद्योगपती, राजकीय नेते यांनाही बकुल अंमली पदार्थ पुरवत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


कुठल्या सांकेतिक शब्दांचा वापर?

अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आणि तपास यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी अंमली पदार्थांचे तस्कर नेहमीच सांकेतिक भाषांचा वापर करतात. यावेळी लॉर्ड शिवा, दलाई लामा, लॉर्ड बुद्धा या नावांचा वापर देखील हे तस्कर करतात. कोकेनसाठी ओजो किंवा व्हाईट, एम. डी. रातराणी, कॅनाबीज साठी हर्बलवीड, तर हशिशला हॅश असे शब्द वापरले जातात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा