सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिसांचा तपास ठप्प, ‘ते’ ४ अधिकाऱीही क्वारंटाईन

तिवारी यांच्यानंतर आता तपासासाठी आलेल्या ४ अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन केलं गेलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिसांचा तपास ठप्प, ‘ते’ ४ अधिकाऱीही क्वारंटाईन
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या तपासात पावला पावलावर अडथळे येत आहेत. तपासासाठी आल्या दिवसांपासून त्यांना अनेक परिस्थितींचा सामना करावा लागत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारहून एसपी विनय तिवारी हे रविवारी मुंबईत आले. या प्रकरणाच्या तपासात ते लक्ष घालणार तोच कोरोना संक्रमण काळातील नियमानुसार, त्यांच्या हातावर १५ दिवसांचा क्वारंटाईन शिक्का मारत, त्यांना १५ आॅगस्टपर्यंत क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. तिवारी यांच्यानंतर आता तपासासाठी आलेल्या ४ अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन केलं गेलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११०५ नवे रुग्ण, रविवारी ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत, सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस मुख्य आरोपीला सोडून नको त्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलवत असल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता.  सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची दिशाच बदलली. या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. ज्यावेळी त्यांनी या प्रकणाचा तपास सुरू केला. त्या दिवसापासून ते स्वतंत्र तपास करत आहेत. बिहार पोलिसांनी प्रथम सुशांतच्या बॅकेती व्यवहारांवर लक्ष केंद्रीत करत, बॅकेतून सुशांतच्या खात्यावरून वळवण्यात आलेल्या पैशांची माहिती जमा केली. आत्महत्येच्या दिवशी घरात उपस्थितांकडे चौकशी केली. या प्रकरणात आता राजकिय नेत्यांनीही उड्या टाकत, गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीसाठी तगादा लावला आहे. मात्र गृहमंत्र्यांनी सीबीआय चौकशीला स्पष्ठ नकार दिला आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा

या आत्महत्येच्या चौकशीसाठी बिहारकडून एसपी विनय तिवारी यांना रविवारी महाराष्ट्रात पाठवण्यात आले होतं. महाराष्ट्रात उतरल्यानंतर ते जलदगतीने या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा असतानाच, मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याबाहेरून आलेल्या व्यक्तीला १५ दिवस क्वारंटाईन ठेवण्याबाबतचे नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार  एसपी विनय तिवारी यांच्याही हातावर १५ आँगस्टपर्यंत क्वारंटाईन राहण्याबाबतचा स्टॅम्प मारण्यात आला. विनय कुमार यांच्या हातावर रात्री ११ वा जबरदस्ती क्वारंटाईन चा शिक्का मारत त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तिवारी यांना सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले होते.  त्यांच्या पाठोपाठ आता इतर ४ तपास अधिकार्यांनाही क्वारनटाई करण्यात आलं असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात बिहार पोलिसांच्या हाथी महत्वाचे धागेदोरे न लागावेत या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून हे सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र पालिकेने कोविड-१९ च्या नियमानुसार त्यांना क्वारनटाईन केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या संपूर्ण घटनेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सोमवारी या घटनेला अनुसरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवल्याचे सांगितले जाते.


 


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा