सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, धर्मा प्रोडक्शनचे अपूर्व मेहताची पोलिसांकडून चौकशी

सुशांतने नुकतेच धर्मा प्रोडक्शनसोबत ड्राइव्ह हा चित्रपट केला होता. त्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही सुशांतसोबत सहकलाकार होती. हा चित्रपट पर्यायी वेब सिरिजवर प्रदर्शीत करण्यात आल्याने सुशांत नाराज असल्याचे बोलले जात होते.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, धर्मा प्रोडक्शनचे अपूर्व मेहताची पोलिसांकडून चौकशी
SHARES

सुशांत सिंहच्या आत्महत्येला ४० दिवस उलटले, तरी सुशांतने आत्महत्या का ? केली कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेश भट्ट, संजय लिला भन्साळीसह अनेक कलाकार आणि सुशांतच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी केली. त्यात आज एक नाव वाढलं ते म्हणजे धर्मा प्रोडक्शनचे अपूर्व मेहता यांचे, पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अपूर्व मेहता यांची तब्बल ४ तास चौकशी केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मागील अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विविध कलाकार, दिग्दर्शक आणि बाँलीवूडमधील कलाकारांना वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले जात आहे. त्याच प्रमाणे मंगळवारी पोलिसांनी धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता चौकशीसाठी बोलवले होते. त्यानुसार ते अंबोली पोलिस ठाण्यात  चौकशीसाठी हजर झाले होते. पोलिसांनी त्याची तब्बल ४ तास चौकशी केली.  सुशांतने नुकतेच धर्मा प्रोडक्शनसोबत ड्राइव्ह हा चित्रपट केला होता. त्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही सुशांतसोबत सहकलाकार होती. हा चित्रपट पर्यायी वेब सिरिजवर प्रदर्शीत करण्यात आल्याने सुशांत नाराज असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी धर्मा प्रोडक्शनने सुशांतसोबत केलेल्या करारनाम्याचे कागदपत्रही चौकशीसाठी मागवले होते. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत ४१हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचाः- रामाच्या नावानं…

१४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरु आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्याला कुठले नैराश्य होते, त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटत होती, आपले करिअर संपणार, मला कोणीतरी मारणार आहे असे त्याला नेहमीच भीती वाटत होती. त्याला नक्की कोणाची भीती वाटत होती, करिअरच्या सुरुवातीला चांगले चित्रपट मिळत असताना तो अचानक नैराश्यात का गेला होता. त्याच्या आत्महत्येमागे बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे आता बॉलिवूडशी संबंधित प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. संजय लिला भन्साली, रुमी जाफरी, आदित्य चोप्रा यांच्यानंतर पोलिसांनी कंगणा राणवत हिला चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. मात्र कंगणा ही सध्या मनाली येथे वास्तव्यास आहे, तिला मुंबईत येणे शक्य नाही. दरम्यान सुशांत सिंह  राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवीन टिव्स्ट समोर आला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीवरच आता संशय घेतला जात आहे. सुशांतला प्रेमात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळून याला आत्महत्येस प्रवृत केल्याचा आरोप आता रियावर केला जात आहे. या प्रकरणी बिहारच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात रिया विरोधात तक्रार नोंदवण्या आली आहे. ही तक्रार दुसरी तिसरी कुणी नसून सुशांतच्या वडिलांनी केली आहे.

हेही वाचा-महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा