वेगाची नशा नडली, बाइकस्वार पोहोचला रुग्णालयात

दारूच्या नशेत भरधाव वेगात बाइक चालवणाऱ्या एका तरूणाला वेगाशी स्पर्धा करणं चांगलंच महागात पडलं आहे. तुषार वळुंदे असं या जखमी बाइकस्वाराचं नाव असून त्याच्यासोबत बाइकरेस करणारे दोघे मित्र पळून गेले आहेत.

वेगाची नशा नडली, बाइकस्वार पोहोचला रुग्णालयात
SHARES

दारूच्या नशेत भरधाव वेगात बाइक चालवणाऱ्या एका तरूणाला वेगाशी स्पर्धा करणं चांगलंच महागात पडलं आहे. तुषार वळुंदे असं या जखमी बाइकस्वाराचं नाव असून त्याच्यासोबत बाइकरेस करणारे दोघे मित्र पळून गेले आहेत. तुषारवर परळच्या के.ई.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.


कसा झाला अपघात?

दादरच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शिंदेवाडी परिसरात ५ एप्रिल रोजी भोईवाडा पोलिसांनी रात्रीची गस्त ठेवली होती. त्यावेळी पोलिसांनी भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्याच्या हेतूने रस्त्यात बेरिकेट्स उभे केले होते.




दारूच्या नशेत

त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या तुषार आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शेजारीला कारचा आडोसा घेत बाइक पळवली. मात्र नशेत असल्याने तुषारचं बाइकवरील नियंत्रण सुटल्याने त्याची बाइक बेरिकेट्सला जोरदार धडकली. या अपघाताने बाईक आणि बाईकवर बसलेला तुषार काही अंतरावर फेकले गेले.


मित्र गेले पळून

हा अपघात इतका भीषण होता की, त्या बाइकचा चेंदामेंदा झाला. या अपघातात तुषार गंभीर जखमी झाला. त्यावेळी मित्रांनी त्याला मदत न करता पोलिसांना पाहून तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषारला अखेर पोलिसांनी उपचारासाठी परळच्या के.ई.एम रुग्णालयात दाखल केलं. पोलिस चौकशीत त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झालं. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

वर्षभरात विमानतळावरून १०७ कोटींचं सोनं जप्त

एसआरए घोटाळ्यातील ३३ फ्लॅट जप्त, बाबा सिद्दीकाचा सहभाग उघड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा