झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुलगा बचावला

झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला त्यांचा मुलगा यामध्ये बचावला.

झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुलगा बचावला
SHARES

झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला त्यांचा मुलगा यामध्ये बचावला. भाईंदरमध्ये शनिवारी ही दुर्घटना घडली. भाईंदर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

जगराम प्रजापती (४१) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रजापती भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ राहत होते. शनिवारी दुपारी ते भाईंदर रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांचा 18 वर्षीय मुलगा अमितही त्यांच्यासोबत होता. यावेळी क्रॉस गार्डनजवळ अचानक झाडाच्या फांद्या त्यांच्या दुचाकीवर कोसळल्या. त्यामुळे त्यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. यामध्ये ते खाली पडले. या घटनेत जगराम प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकवरुन  उडी मारल्यामुळे मुलगा अमितचा जीव वाचला. त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

जगराम प्रजापती यांना मीरा रोडमधील इंदिरा गांधी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. जगराम प्रजापती हे पीओपीचे काम करत होते. कमवत्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने जगराम प्रजापती यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा