पोलिसांची मुलं बनली चोर

 Mumbai
पोलिसांची मुलं बनली चोर
Mumbai  -  

कांदीवली - बाईक चोरीच्या आरोपाखाली एका बेस्ट ड्रायव्हरला,एका पोलिसाच्या मुलाला आणि एका बाईक्स रिपेअरिंगवाल्याला कांदीवली पोलिसांनी अटक केली आहे. अमरजीत माने(31), कमलेश कुमार भारतीय (30) आणि एका पोलिसांच्या मुलाला कांदीवली पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. यातील अमरजीत माने हा बेस्ट बसचा ड्रायव्हर असून त्याची आई वरिष्ठ पोलीस निरीक्षक होती. तर एका आरोपीचे वडील हे आता पोलीस आहेत. कांदीवली पोलीस ठाण्यात 28 फेब्रुवारीला बाईक चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता दोन पोलिसांच्या मुलांनी बाईक्स चोरून गॅरेजवाला कमलेश कुमार भारतीयच्या मदतीने गाडीचा पार्ट काढून विकल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान पीडिताने या आरोपींकडून व्यवहार केला होता. मात्र त्याने आरोपींचे पैसे न दिल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले.

Loading Comments