वाढदिवसाला मिळालेल्या दुचाकीने केला घात

 Pali Hill
वाढदिवसाला मिळालेल्या दुचाकीने केला घात

मुंबई - वाढदिवशी मुलाला 15 लाखांची मोटारसायकल भेट मिळाली खरी पण दुचाकीच्या अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला. या अपघातात शुभम भौगवाला याचा मृत्यू झाला असून मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे.

एमएमके महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणारा शुभम हा माहिमचा रहिवासी आहे. 5 जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवासाच्यानिमित्त पालकांनी त्याला परदेशी बनावटीची मोटारसायकल भेट म्हणून दिली होती. सुपर बाइक्सचे वेड असलेल्या शुभमने दोन दिवस नवी कोरी महागडी मोटारसायकल चालवली. पण शुक्रवारी सकाळी तो सुलतान नावाच्या मित्राला घेऊन काॅलेजला जात असताना वांद्रे (प.), रिक्लेमेशन इथल्या पुलावरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीची धडक बसल्याने अपघात झाला. तेव्हा शुभम आणि सुलतान हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान शुभचा मृत्यू झाला. तर सुलतानला उपचारासाठी प्रथम भाभा रुग्णालयात नंतर बाॅम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Loading Comments