रस्त्यावर थुंकल्यानं महापालिकेची ११५ जणांवर कारवाई

महापालिकेनं रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात शनिवारी ११५ जणांवर कारवाई करत १ लाख १५ हजार रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती समोर येत आहे.

रस्त्यावर थुंकल्यानं महापालिकेची ११५ जणांवर कारवाई
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे. मुंबईतील सार्वजविक वाहनांसह ठिकाणं देखील स्वच्छ करण्यात येत आहेत. अशातच महापालिकेनं रस्त्यावर थूंकून रस्ता खबार करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी महापालिकेनं रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात शनिवारी ११५ जणांवर कारवाई करत १ लाख १५ हजार रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती समोर येत आहे. 

राज्यात जमावबंदी लाजू धाल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य सरकारकडून याआधीच करण्यात आलं आहे. त्यामुळं रस्त्यावर भटकणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. परिणामी, थुंकणाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईतही घट झाली. सोमवारी फक्त ७ जणांवर कारवाई झाली. वांद्रे पूर्व, बोरिवली व भांडुप या ३ च विभागात थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

वांद्रे पूर्व, भांडुपमध्ये प्रत्येकी २ व कांदिवलीत तिघांवर कारवाई करून एकूण ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेनं कडक कारवाई सुरू केली आहे. २०० रुपयांचा दंड थेट दीड हजार करण्यात आला आहे.

सोमवार करण्यात आलेली  कारवाई

वांद्रे पू. - २ - २०००

कांदिवली - ३ - ३०००

भांडुप  - २ - २०००

एकूण - ७ - ७०००



हेही वाचा -

संचारबंदीचा गुढीपाडव्याच्या बाजाराला फटका

भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा