हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी चौथी अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालया पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी चौथी अटक केली आहे. महापालिकेचे निवृत्त सब इंजिनिअर शितला प्रसाद कोरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालया पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी चौथी अटक केली आहे. महापालिकेचे निवृत्त चीफ इंजिनिअर शितला प्रसाद कोरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी याआधी मुंबई पालिकेतील सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते, नीरजकुमार देसाई, महापालिकेचा कार्यकारी अभियंता अनिल पाटील या तीन जणांना अटक केली आहे


कोरी यांची सही

चीफ इंजिनिअर शितला प्रसाद कोरी २ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शितला प्रसाद कोरी यांच्या कार्यकाळात पुलाची पाहणी करण्यात आली होती. त्या पाहणी अहवालावर कोरी यांची सही देखील आहे. त्यामुळं कामात कसूर झाल्यानं शितलाप्रसाद कोरी यांना अटक करण्यात आली आहे.


७ जणांचा मृत्यू

सीएसएमटी इथं १४ मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून ३१ हून अधिक जण जखमी झाले होते.  हेही वाचा -

मुंबईतील आणखी ६ पूल धोकादायक

एअर इंडियाच्या इमारतीवर १४०० कोटींची बोलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या