धावत्या ट्रेनमध्ये बीएमसीच्या नर्सचा विनयभंग, तरुणाला अटक

पीडित नर्स रविवारी रात्री आपलं काम संपवून डहाणू येथील आपल्या घरी निघाली होती. तिने रात्री १० वाजून ५० मिनिटांनी विरारहून सुटणारी शेवटची ट्रेन पकडली होती.

धावत्या ट्रेनमध्ये बीएमसीच्या नर्सचा विनयभंग, तरुणाला अटक
SHARES

मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत शिताफीनं २२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  

पीडित नर्स रविवारी रात्री आपलं काम संपवून डहाणू येथील आपल्या घरी निघाली होती. तिने रात्री १० वाजून ५० मिनिटांनी विरारहून सुटणारी शेवटची ट्रेन पकडली होती. वाणगाव रेल्वे स्थानकावर आरोपी तरुण महिला डब्यात शिरला. त्याने नर्सच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नर्सने प्रसंगावधान दाखवत आरोपीशी प्रतिकार करत मोबाईल परत मिळवला.

यानंतर आरोपीने नर्सचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. डहाणू स्टेशन येताच नर्सने आरडाओरडा केला.त्यावेळी आरोपीने पोबारा केला होता. मात्र, तिने सांगितलेल्या वर्णनावरुन रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि पळून जात असलेल्या आरोपीला पकडले.

आरोपी तरुणावर पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात चोरी आणि विनयभांगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयानं आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन काही दिवसांपूर्वीच ३५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. डोंबिवली येथे राहणाऱ्या विद्या पाटील या अंधेरीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडली. त्यावेळी त्यांच्या महिला डब्यामध्ये केवळ पाच ते सहा महिला प्रवासी होत्या.

लोकल कळवा रेल्वे स्थानकात आल्यावर एक चोरटा डब्यात शिरला. चोराने विद्या यांच्या हातात असलेला मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना हिसका दिला. त्यामुळे त्या धावत्या रेल्वेखाली फेकल्या गेल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

     


हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा