जप्त सिलिंडर्स गॅस कंपन्यांच्या हवाली

 Pali Hill
जप्त सिलिंडर्स गॅस कंपन्यांच्या हवाली

मुंबई - मुंबई पालिकेने कारवाईत जप्त केलेले गॅस सिलिंडर्स गॅस कंपन्यांच्या हवाली केले आहे. मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवरील अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांंविरोधात कारवाई करत तीन हजारांहून अधिक सिलिंडर्स जप्त केले होते. हे सिलिंडर्स ग्राहकांच्या उपयोगात यावेत यासाठी भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांकडे हस्तांतरीत करावेत, असे आदेश पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार नुकतेच 2950 सिलिंडर्स पैकी 1495 सिलिंडर्स हिंदुस्थान पेट्रोलियमला तर भारत पेट्रोलियमला 1455 सिलिंडर्स हस्तांतरीत करण्यात आले आहेत. तर लवकरच उर्वरित 433 सिलिंडर्सही हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.

Loading Comments