भावाला वाचवताना दोघे बुडाले

पवई - चांदिवलीमध्ये दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. सद्दाम आणि अस्लम अब्दुल शेख अशी मृत भावांची नावं आहे. तर तिसरा भाऊ जावेद शेख याला वाचवण्यात यश आलं आहे.

मंगळवारी रात्री ही घटना चांदिवलीतल्या मनु भाई खाणीमध्ये घडली. मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यानं सद्दामनं पवई तलावात उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी अस्लम आणि जावेद यांनी उडी मारली. सद्दामला वाचवण्याच्या प्रयत्नात अस्लमही पाण्यात बुडाला. पण तिसरा भाऊ जावेद शेख याला वाचवण्यात मात्र यश आले. साडे नऊच्या सुमारास अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 12.30 वाजता दोन्ही मृतदेह शोधून काढण्यास अग्नीशमन दलाला यश आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

Loading Comments