सायबर गुन्हे रोखण्यासाठी 'सिंघम'चा पुढाकार


सायबर गुन्हे रोखण्यासाठी 'सिंघम'चा पुढाकार
SHARES

सायबर गुन्ह्यांसंबंधी लोकांमध्ये जनजागृती करुन या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मैदानात उतरला आहे. मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरोधात जनजागृती करण्यासाठी त्याची निवड केली आहे.

अभिनेता अजय देवगणने शुक्रवारी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात अभिनेता अजय देवगण लोकांना भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करताना दिसतोय. 'बँक कर्मचारी असल्याचे सांगून कुणी तुमचे कार्ड ब्लॉक करण्याच्या नावावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी), सीव्हीव्ही किंवा पासवर्ड मागत असेल तर तुम्ही त्यांना तुमचा पासवर्ड अजिबात देऊ नका. तुम्हाला केलेला तो कॉल फ्रॉड असू शकतो', असे अजय या व्हिडिओतून सांगत आहे. तक्रार करण्यासाठी पोलिसांनी 9820810007 ही हेल्पलाईन दिली असून, तुम्ही यावर तक्रार करू शकता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा