बोगस सीडीआर प्रकरण: अभिनेता नवाजचा भाऊ चौकशीसाठी हजर

ठाणे सीडीआर प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा भाऊ शमशुद्दीन सिद्दिकी हा सोमवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा १ च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. अद्याप चौकशी सुरू असून शमशुद्दीनची चौकशी संपल्यानंतरच गुन्ह्यातील त्याचा सहभाग कळू शकेल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

बोगस सीडीआर प्रकरण: अभिनेता नवाजचा भाऊ चौकशीसाठी हजर
SHARES

ठाणे सीडीआर प्रकरणी सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा भाऊ शमशुद्दीनला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाने सोमवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं.


काय आहे प्रकार?

मोबाइल कॉलचा तपशील बेकायदारित्या मिळवून त्याची विक्री करणाऱ्या गुप्तहेरांच्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मार्च महिन्यात पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी १२ जणांना अटक केली होती.

याप्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रशांत पालेकर, जिगर मकवाना, माकेश पांडियन, प्रशांत सोनावणे, समरेश झा, अजिंक्य नागरगोजे, किर्तेश कवी आणि रंजनी पंडित यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं होतं. २ हजार १६३ पानांच्या या आरोपपत्रामध्ये या गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे तसंच २५ साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.


नवाजवरही आरोप

तपासादरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्रींची नावं पुढं आल्याने हे प्रकरण फारच चर्चेत आलं होतं. त्यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीचंही नाव समोर आलं होतं. त्यावेळी नवाज याने त्याच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर डिटेल्स मागितल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मार्च महिन्यात नवाजुद्दीनला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवलं होतं.

याप्रकरणात पोलिसांनी नवाजच्या भावाला देखील समन्स पाठवलं होतं. त्यानुसार नवाजचा भाऊ शमशुद्दीन सिद्दिकी हा सोमवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा १ च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. अद्याप चौकशी सुरू असून शमशुद्दीनची चौकशी संपल्यानंतरच गुन्ह्यातील त्याचा सहभाग कळू शकेल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा -

पत्नीचा फोन टॅप, नवाज मीडियावर भडकला!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा