NCB ची मोठी कारवाई, अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजरच्या घरातून ड्रग्ज जप्त


NCB ची मोठी कारवाई, अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजरच्या घरातून ड्रग्ज जप्त
SHARES

महागडे परदेशी अंमली पदार्थ भारतात तस्करी केल्याप्रकरणी मुंबई NCB ने करन सजनानी या कोट्याधीशाला अटक केली आहे. NCB चे धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून याच प्रकरणी अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला हिलादेखील NCB ने अटक केली आहे. तसंच राहिला हिची बहीण आणि मित्र करन याला NCB ने ताब्यात घेतलं आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित अंमली पदार्थ तस्कर अनुज केशवानी नावाच्या व्यक्तीला एनसीबीने अटक केली होती. या अनूज केशवानीला करन सजनानी गांजा सप्लाय करायचा. तसंच परदेशातील महागड्या अंमली पदार्थांची तस्करीही हा करन सजनानी करत असल्याचं उघड झालं आहे. करन सजनानी हा एक कोट्याधीश बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्याकडून एनसीबीने ७५ किलो भारतीय गांजा, तर १२५ किलो परदेशी अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

धक्कादायक म्हणजे हा करन सजनानी आर्टिशनल मॅरुआना ज्वाईंट अमेरिकेचे इम्पोर्टेंड बड रिकामे बॉक्स सांगून एअरपोर्टवरुन घेवून आला होता. ज्याचे वजन १.१ किलो आहे. ज्याची बाजार किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे. करन सजनानी हा परदेशी अंमली पदार्थ तस्करी करुन आणायचा आणि ते भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात तस्करी करायचा. सजनानी याचे भारतभर अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट आहे ज्याची लिंक इंटर नॅशनल तस्करांशी आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा