अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप


अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप
SHARES

अभिनेत्री पायल रोहतगी हिला शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पायलवर ती राहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांशी झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरल्याचा आरोप केला आहे. मात्र नंतर तिनं ती पोस्ट डिलीट केली होती.

एवढंच नाही तर पायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी आणि लहान-लहान गोष्टींवरुन सोसायटीतील लोकांशी भांडत असल्याचा आरोप केला आहे.

अध्यक्ष आणि सोसायटीच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पायल रोहतगी हिला अहमदाबाद सॅटेलाइट पोलिसांनी अटक केली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, २० जून रोजी सोसायटीत बैठक झाली. रोहतगी ही या मीटिंगची सदस्य नव्हती. असं असूनही, ती मीटिंगमध्ये पोहोचली आणि बोलू लागली. जेव्हा अध्यक्षांनी तिला अडवले तेव्हा पायलनं सर्वांसमोर त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर पायलनं सोशल मीडियावरही आपला राग काढला होता. एका पोस्टमध्ये पायलनं अध्यक्षांचा नावाचा उल्लेख करत त्यांच्याविरूद्ध अश्लील भाषा वापरली होती. मात्र तिच्या या पोस्टवर काही कमेंट आल्यानंतर तिनं ही पोस्ट डिलीट केली होती.

सोसायटीचे सदस्य आणि व्यवसायानं डॉक्टर असलेले जयेश यांच्या म्हणण्यानुसार, पायल रोहतगीची वागणूक मुळीच चांगली नाही. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून कोणाशीही भांडते. एवढेच नव्हे तर ते सोसायटीतील मुलांनादेखील ती सोडत नाहीत. मुले सोसायटी कंपार्टमेंटमध्ये खेळताना किंवा मस्ती करताना दिसल्यास पायल त्यांच्यावरही सतत ओरडत असते.

पायल रोहतगीनं २००२ मध्ये 'ये क्या हो रहा है' या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. नंतर तिला चित्रपटांमध्ये विशेष यश मिळू शकले नाही. पायलनं कुस्तीवीर संग्राम सिंगसोबत लग्न केलं आहे. तिनं वीस हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसपासून ते खतरों के खिलाडीपर्यंतच्या अनेक रिअलिटी शोमध्येदेखील ती सहभागी झाली आहे.

पायल तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून ती आपलं मत सोशल मीडियावर मांडते. तिचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावरून अनेकदा ती अडचणीत देखील सापडली आहे.

पायलनं कास्टिंग काउचबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. ही भूमिका देण्याऐवजी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी त्याला विविध ऑफर कशा दिल्या, हे तिनं सांगितलं होतं.

बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारावर पायलनं आपलं मत मांडलं आहे. याशिवाय कंगनाचे ट्विटर अकाउंट बंद केल्यावर पायल यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देखील तिनं अनेकांवर आरोप केले आहेत.



हेही वाचा

दादरमध्ये एका डॉक्टरला अटक; कारण वाचून व्हाल थक्क!

ड्रग्स प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला NCB कडून अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा