ड्रग्स प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला NCB कडून अटक

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीनं (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे.

ड्रग्स प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला NCB कडून अटक
SHARES

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीनं (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीनं इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीनं अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कस्टडीची मागणी एनसीबी अधिकारी करतील.

गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. याच कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचं एनसीबीच्या लक्षात आलं. त्यानंतर आता एनसीबीनं ही कारवाई केली आहे.

कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे.हेही वाचा

धावत्या ट्रेनमध्ये बीएमसीच्या नर्सचा विनयभंग, तरुणाला अटक

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह आत्महत्या, पतीचं कोरोनाने निधन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा