शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह आत्महत्या, पतीचं कोरोनाने निधन

रेश्माच्या घरात चालण्याचा, पळण्याचा जोरात आवाज येतो म्हणून या तिघांनी रेश्माविरुद्ध सोसायटीकडे आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह आत्महत्या, पतीचं कोरोनाने निधन
SHARES

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने (woman) आपल्या आपल्या दहा वर्षाच्या मुलासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. यानुसार पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शादाब खान असं आरोपीचं नाव आहे. 

ही घटना सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. रेश्मा ट्रेनचिल (४४) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. त्यांच्या पतीचं काही दिवसांपूर्वीच कोरोनाने निधन झालं होतं. अशातच इमारतीत राहणारं एका कुटुंब तिला त्रास देत होतं. या त्रासातूनच रेश्मा यांनी चांदिवलीतील नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीच्या १२ मजल्यावरुन मुलासह उडी घेत आपलं जीवन संपवलं.

साकीनाका पोलिसांना तपासादम्यान रेश्मा यांनी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये तिने त्याच इमारतीत राहणाऱ्या आयुब खान, शहनाज खान व शादाब खान या तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.

रेश्माच्या घरात चालण्याचा, पळण्याचा जोरात आवाज येतो म्हणून या तिघांनी रेश्माविरुद्ध सोसायटीकडे आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. रेश्मा आणि तिचा पती आपला मुलगा याच्यासह १० एप्रिल रोजी नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले. तेव्हापासून आरोपी कुटुंबियांसोबत त्यांचे मतभेद होते. मुलाच्या आवाजाच्या होणाऱ्या त्रासासंबंधी आरोपी कुटुंबियांनी वारंवार सोसायटीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या त्रासाला कंटाळून रेश्माने आत्महत्या केल्याचं सुसाईट नोटवरून समोर आलं आहे. 

    


हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा