दादरमध्ये एका डॉक्टरला अटक; कारण वाचून व्हाल थक्क!

एका डॉक्टरनं कोणतीही पदवी नसताना तब्बल १ हजार रुग्णांवर मुळव्याधाच्या शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दादरमध्ये एका डॉक्टरला अटक; कारण वाचून व्हाल थक्क!
SHARES

एका डॉक्टरनं कोणतीही पदवी नसताना तब्बल १ हजार रुग्णांवर मुळव्याधाच्या शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मुंबईच्या दादर (dadar) परिसरात घडला आहे. डॉक्टर एस. मुकेश कोटा असं या डॉक्टरचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डॉक्टर एस. मुकेश कोटा याच्याकडं एम. एस. सर्जरीचं कोणतंही प्राविण्य नसताना दादरसारख्या ठिकाणी दवाखाना थाटून १ हजार मुळव्याधाच्या शस्त्रक्रिया केली. मात्र एका टॅक्सीचालकावरील शस्त्रक्रिया ही अयशस्वी ठरल्यानंतर त्याचा हा कारनामा उघडकीस आला. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी डॉ. मुकेश कोटा याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गोरेगाव (goregaon) इथं राहणारा एक टॅक्सीचालक मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झाला होता. यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरची शोधाशोध सुरू असतानाच त्याला इतर टॅक्सीचालकांनी दादर टी. टी. येथील गोपालराव पाईल्स सेंटरबाबत सांगितलं. त्यावेळी या डॉक्टरबाबत टॅक्सीचालकानं अधिक माहिती घेतली असता मुंबईत ठिकठिकाणी या क्लिनिकचे 'मूळव्याधीवर विनाशस्त्रक्रिया उपचार' असे फलक झळकत असल्याचं दिसून आले.

टॅक्सीचालकानं २० फेब्रुवारी रोजी पत्नीसह हे क्लिनिक गाठलं. एकदा ड्रेसिंग करून डॉक्टर एस. मुकेश कोटा यांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये गेल्यानंतर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून कोटा यांनी काही अवधीत शस्त्रक्रिया उरकली आणि २५ हजार रुपये टॅक्सीचालकाकडून घेतले. पत्नीसोबत टॅक्सीने घरी जात असताना शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. टॅक्सीचालकाचे कपडे, टॅक्सीची सीट रक्ताने माखली आणि यामुळे तो बेशुद्ध पडला. पत्नीने टॅक्सी केईएम रुग्णालयात नेऊन पतीला दाखल करून घेतले.

केईएम रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडल्यानंतर टॅक्सीचालकानं लेखी तक्रार माटुंगा पोलिस ठाण्यात केली. डॉक्टर कोटा यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळं मलविसर्जनावरील नियंत्रण सुटल्यानं डायपर वापरावे लागते. अयशस्वी शस्त्रक्रियेमुळं वाहनही चालविण्यासाठी बसता येत नसल्यानं उदरनिर्वाह करता येत नसल्याचे टॅक्सीचालकाने तक्रारीत म्हटले होते.

या तक्रारीनंतर पोलिसांनी कोटा याला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने गेल्या ३ वर्षात जवळपास १ हजार शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी शस्त्रक्रिया तसेच डॉक्टर कोटा यांच्या पदवी संदर्भातील कागदपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तसेच वैद्यकीय अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले. जे. जे. रुग्णालयामध्ये याबाबत तज्ञसमिती गठीत करण्यात आली.

या समितीने २१ जून रोजी आपला अहवाल पोलिसांना सादर केला. एमबीबीएस डॉक्टर मूळव्याध संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. मुळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याकरिता डॉक्टरने एम. एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे. डॉक्टर कोटा यांनी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा