अश्लील व्हिडिओने सोनू वालिया हैराण

 Goregaon
अश्लील व्हिडिओने सोनू वालिया हैराण

गोरेगाव - बॉलिवूडमध्ये एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेली अभिनेत्री सोनू वालिया सध्या तिला येणाऱ्या अश्लील व्हिडिओमुळे हैराण झाली आहे. या प्रकरणी तिने गोरेगावच्या बंगूरनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील आठवड्यापासून कोणी तरी अज्ञात इसम सोनू वालिया हिला अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच फोन करून त्रास देत असल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात आयपीसी 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


हा इसम ज्या नंबरवरून फोन आणि अश्लील व्हिडिओ पाठवत आहे ते सगळे नंबर सध्या बंद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड यांनी दिली.

Loading Comments