‘बल्क मॅसेज’चा वापर करून फसवणूक कऱणाऱ्या लेखकाला अटक

स्टोरी रायटींगमधून त्याची चांगली कमाई होत होती. परंतु कोरोनामुळे अचानक मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि शुभम आर्थिक अडचणीत सापडला.

‘बल्क मॅसेज’चा वापर करून फसवणूक कऱणाऱ्या लेखकाला अटक
SHARES

बॉलीवूडमधल्या एका स्टोरी रायटरने प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला आणि आता स्वत: चीच एक फिल्मी स्टोरी बनवून बसला आहे. बँक पाठवते त्या प्रमाणे हुबेहुब मेसेज त्याने अनेकांना पाठवून लाखोरुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. शुभम शाहू असे या आरोपीचं नाव असून या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

शुभम शाहू हा बॉलीवूडमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी स्टोरी लिहितो. स्टोरी रायटींगमधून त्याची चांगली कमाई होत होती. परंतु कोरोनामुळे अचानक मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि शुभम आर्थिक अडचणीत सापडला. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेलं बॉलीवूडमधील त्याच्या हाताचं काम गेलं, दररोज हजारो रुपये उधळण्याची सवय असल्याने ऐका ऐकी पैशांची देवणा घेवाण थांबल्यामुळे  तो मानसिक तणावात होता. अशातच एक नामी शक्कल लढवून त्याने नागरिकांची फसवणूक करण्यास सुरूवात केली. मात्र ही फसवणूक त्याने आपल्या प्रियसिला खूश ठेवण्यासाठी केल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचाः- कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

शुभमचं लॉकडाऊनमुळे काम बंद झालं. मात्र, प्रेयसीला सतत महागडे गिफ्ट देणं त्यानं बंद केलं नाही. यासाठी त्यानं चित्रपटातील एका फिल्मी फसवणुकीचा फंडा आजमावला. आश्चर्य म्हणजे पहिल्याच झटक्यात फसवणूक करुन शुभमला हजारो रुपये मिळाले. मग काय शुभमनं चक्क स्टोरी रायटींग सोडून फसवणुकीचा नवी धंदा सुरु केला.अनलॉकनंतर सगळे व्यवहार खुले झाल्याने शुभमनं आपल्या प्रेयसीला बाहेर फिरायला घेवून जाण्यासाठी मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत विमानाची तिकिट त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग केलं. प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्याकरता पैसे मिळवण्यासाठी शुभनने बल्क मॅसेजचा वापर केला. यासाठी त्यानं इंटरनेटवर त्या ट्रॅव्हल कंपनीमधून या आधी बुकिंग केलं आणि त्याचे पैसे ॲानलाईन ट्रान्सफर केल्यानंतर येणाऱ्या मॅसेजचा फोटो काढून इंटरनेटवर अपलोड केला होता. तोच मॅसेज पाहुन तसाच मॅसेज बनवून त्याने ट्रॅव्हल कंपनीला पैसे पाठवल्याचे भासवलं. फक्त विमानाची तिकिटच नाही तर शुभम यानं प्रेयसीला सोन्याच्या बांगड्या गिफ्ट केल्या होत्या त्याकरता ज्वेलर्सलाही शुभमनं असंच गंडवलं होतं. मात्र, शुभमचा हा फंडा जास्त दिवस चालला नाही. ओशिवारा पोलिसांनी शुभमला अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा