संशयास्पद बॅगमुळे खळबळ

 Bhandup
संशयास्पद बॅगमुळे खळबळ

भांडुप - भांडुप पश्चिमेतील आमंत्रण शोरूमसमोर सोमवारी सायंकाळी संशायस्पद बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल दोन तास चाललेल्या थरारनाट्यानंतर बाँबशोधक पथकाने केलेल्या तपासणीत या बॅगमध्ये धोकादायक वस्तू नसल्याचे सिद्ध झाल्यावर सर्वाँनी सुटकेचा निश्वास सोडला.

संध्याकाळी सहाच्या सुमारात संशयास्पद बॅग आढळल्यावर भांडुप पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मेटल डिटेक्टरने तपासणी केली असता, त्यात संशयास्पद वस्तू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अखेर पोलिसांनी संपूर्ण स्थानक रोड बंद करून बाॅम्ब शोधक पथक आणि श्वानपथक बोलावून घेतले. अखेर तब्बल तासभराच्या तपासणीनंतर बॅग उघडली असता त काही कागदपत्रे, पासबुक, कम्प्युटरचे पार्ट आणि पेन ड्राईव्ह सापडले. मात्र या संशयास्पद बॅगेमुळे तब्बल दोन तास सर्वच यंत्रणा कामाला लागल्या होत्या.

Loading Comments