बलात्कार प्रकरणात मिमोह चक्रवर्तीला होणार अटक?

मिमोह चक्रवर्ती म्हणजेच 'महाक्षय' याच्यावर एका अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दिल्लीत तक्रार दाखल झाल्यावर अटक टाळण्यासाठी मिमोह आणि योगीता बाली यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

SHARE

ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि अभिनेत्री योगीता बाली यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती म्हणजेच 'महाक्षय' याच्यावर एका अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दिल्लीत तक्रार दाखल झाल्यावर अटक टाळण्यासाठी मिमोह आणि योगीता बाली यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयानं या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी फेटाळून लावला.


नेमकं प्रकरण काय?

काही हिंदी आणि भोजपुरी चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीनं मिमोहवर हा आरोप केला आहे. '२०१५ पासून चित्रपटात काम मिळवून देतो, असं सांगून मिमोह तिचं शारीरिक शोषण करायचा. नकार दिल्यावर लग्नाचं आमिष दाखवून गप्प कारायचा. यातून गर्भवती झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप या अभिनेत्रीनं मिमोहवर केला आहे.


योगीता बालीकडून धमकी

एवढंच नव्हे, तर पीडित अभिनेत्रीनं याप्रकरणी अनेकदा मिथून यांच्याकडे गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला असता योगीता बाली यांनी धमकी देऊन गप्प केल्याचाही या अभिनेत्रीने आरोप केला आहे.


दिल्लीत तक्रार दाखल

याप्रकरणी या अभिनेत्रीनं दिल्लीतील बेगमपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने या अभिनेत्रीने दिल्लीतील स्थानिक न्यायालया (रोहिणी कोर्ट) त धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी मिमोह आणि योगीता बाली यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.


७ जुलैला लग्न

महत्त्वाचं म्हणजे मिमोह ७ जुलै रोजी लग्नबंधनात अडकत आहे. तो अभिनेत्री मदालसा शर्मासोबत लग्न करत अाहे. मदालसा प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा यांची मुलगी आहे. या प्रकरणामुळे लग्नावर कुठलाही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया शीला शर्मा यांनी दिली.हेही वाचा-

अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण

१ कोटींचे डॉलर नेणाऱ्याला विमानतळावर अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या