विनयभंग प्रकरण: HC ने नेस वाडियाविरोधातील खटला केला रद्द

आॅगस्टमध्ये नेस वाडियाने आपल्यावरील विनयभंगाचा खटला रद्द करण्यात यावा, अशा आशयाची याचिका दाखल केली होती. यावर त्याने प्रिती झिंटाकडून उत्तरही मागितलं होतं. एवढंच नाही, तर न्यायालयाने हे प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवण्याचा सल्लाही दोघांना दिला होता.

विनयभंग प्रकरण: HC ने नेस वाडियाविरोधातील खटला केला रद्द
SHARES

बाॅलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक्स बाॅयफ्रेंड आणि बिझनेसमन नेस वाडिया याला विनयभंगाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. प्रितीने त्याच्याविरोधात विनयभंगाचा खटला दाखल केला होता. दोघांच्या सहमतीने ४ वर्षांनंतर हा खटला न्यायालयाने रद्द केला आहे. २०१४ मध्ये प्रितीने नेसविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. 

आॅगस्टमध्ये नेस वाडियाने अटक टाळण्यासाठी आणि आपल्यावरील विनयभंगाचा खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर त्याने प्रिती झिंटाकडून उत्तरही मागितलं होतं. एवढंच नाही, तर न्यायालयाने हे प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवण्याचा सल्लाही दोघांना दिला होता.


काय आहे प्रकरण?

प्रिती झिंटाने २०१४ मध्ये नेस वाडियाविरोधात पोलिसांत छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. आयपीएल मॅच दरम्यान नेसने प्रेक्षकांमध्ये माझा हात पकडून छेड काढली. शिवाय शिवीगाळ करत गायब करण्याची धमकीही दिली. नेससोबत ब्रेकअप झाल्यानंतरही तो वारंवार आपल्याला त्रास देत असल्याचं, तिने तक्रारीत म्हटलं होतं. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये ३० मे २०१४ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मॅच झाली होती. यावेळी दोघांमधील भांडणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.


२०० पानी आरोपपत्र

या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात नेसविरोधात २०० पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. भादंवि कलम ३५४ म्हणजे हल्ला करणे, कलम ५०६ गुन्हेगारी स्वरूपाचा त्रास देणे, कलम ५०९ विनयभंग करणे या कलमांअतर्गत त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, खटला सुरू होण्याआधीच नेसने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती.


यशस्वी मध्यस्ती 

नेसने माफी मागण्याची तयारी दाखवली तर आपण केस मागे घेऊ, असं प्रीतीच्या वतीने न्यायालयाला गेल्या सुनावणीवेळी सांगण्यात आलं होतं. तर नेसने माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वकील आभात फोंडा यांच्यातर्फे सांगितलं होतं. त्यावेळी लेखी माफीची अपेक्षा असं म्हणत दोन्ही वकिलांनी या प्रकरणात मध्यस्ती घडवून अमत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.



हेही वाचा-

बलात्कार पीडितेचा अपमान: गृहराज्यमंत्र्यांनी फटकारलं, मुख्यमंत्र्यांनी सावरलं

गुरू साटमच्या ५ हस्तकांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा