बलात्कार पीडितेचा अपमान: गृहराज्यमंत्र्यांनी फटकारलं, मुख्यमंत्र्यांनी सावरलं

सामुहिक बलात्काराला बळी पडलेली कल्याणची एका पीडित महिला आणि तिच्या मुलीशी बोलताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची जीभ घसरली. न्याय मागण्यासाठी गेलेल्या या पीडित महिलेला सर्वांदेखत "तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचं नाही" असं म्हणत केसरकर यांनी दोघींनाही त्यांच्या दालनातून सोमवारी सायंकाळी हाकलून लावलं होतं.

बलात्कार पीडितेचा अपमान: गृहराज्यमंत्र्यांनी फटकारलं, मुख्यमंत्र्यांनी सावरलं
SHARES

सामुहिक बलात्काराला बळी पडलेल्या पीडितेला न्याय देणं, तर सोडाच; पण तिला अपमानीत करून बाहेर काढल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या विरोधात पीडित महिलेने तक्रार देऊन १२ तास उलटले. तरी पोलिसांनी अद्याप या तक्रारीसंदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली दिसून आली नाही. हे प्रकरण माध्यमांद्वारे प्रकाशझोतात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेवर झालेल्या अन्यायाप्रकरणी कसून चौकशी करण्याचे पोलिस महासंचालकांना आदेश देतानाच पीडितेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे प्रकरण?

सामुहिक बलात्काराला बळी पडलेली कल्याणची एका पीडित महिला आणि तिच्या मुलीशी बोलताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची जीभ घसरली. न्याय मागण्यासाठी गेलेल्या या पीडित महिलेला सर्वांदेखत "तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचं नाही" असं म्हणत केसरकर यांनी दोघींनाही त्यांच्या दालनातून सोमवारी सायंकाळी हाकलून लावलं होतं.

पोलिसांत तक्रार

या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दीपक केसरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर पीडित महिला कुटुंबियांसोबत घडलेल्या प्रकाराबाबत दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेली. त्यावेळी आतापर्यंत घडलेला प्रकार त्यांनी मुख्यमंत्रांना सांगितला. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या गैरवर्तनाची माहितीही त्यांना दिली.

चौकशीचे आदेश

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याशी संपर्क साधून पीडित महिलेच्या गुन्ह्यात कसून चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर घडलेल्या प्रकारावरून तिची समजूतही मुख्यमंत्र्यांनी काढली.

हेही वाचा-

Exclusive: बलात्कार पीडित महिलेचा अपमान, गृहराज्यमंत्री केसरकरांविरोधात पोलिसांत तक्रार

हनी ट्रॅपने आरोपीला अडकवले जाळ्यात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा