लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
SHARES

मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी आरोपातून मुक्तता करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यालयाने फेटाळून लावली.


का फेटाळली याचिका?

मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांनी युएपीए (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोपातून सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित आणि कुलकर्णी यांचा जामीन मंजूर केला असून त्यांच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्यातंर्गत आरोप लावण्यात आले आहेत. सदर आरोप ठेवण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. त्याबाबत पुर्तता करण्यात आलेली नसल्यामुळे आरोपातून त्यांची सुटका करावी, अशी मागणी आरोपींचे वकील अॅड. घाग यांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र सोमवारी कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

२००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८० हून अधिक जखमी झाले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा