SHARE
वर्ल्ड कपमधील भारत - वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या दोघांना जुहूतील सन अँन्ड शाईन या पंचतारांकित हाॅटेलमधून जुहू पोलिसांनी अटक केली आहे. धर्मराज वाला आणि अमरीश भरमभट्ट अशी या दोघांची नावे आहे .या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

२४ मोबाइल हस्तगत

इंग्लडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये गुरूवारी भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सामना रंगला. या सामन्यावर जुहू येथील पंचतारांकित हाॅटेलमध्ये काही जण सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जुहू पोलिसांनी जुहूतील सन अँन्ड शाईन हाॅटेलमध्ये रुम नं ४३० मध्ये कारवाई केली. त्यावेळी दोन्ही आरोपी सामन्यावर सट्टा लावत असल्याचे आढळून आले.  पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून २ लॅपटाॅप, २४ मोबाइल आणि कनेक्टर बाॅक्स हस्तगत केला आहे. या दोघांना  भा.द.वीच्या कलम ४२०, ४६५, ४६८,४७०, ३४ नुसार जुगार कायद्यांतर्गत  ४ (अ) ५ नुसार गुन्हा नोंदवत अटक केली आहे.हेही वाचा -

ओएलएक्सवर गाडी घेण्याचा मोह नेव्ही अधिकाऱ्याला पडला भारी

भाजपा नगरसेविकेने महापालिका अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावली, नगरसेविकेने आरोप फेटाळले
संबंधित विषय
ताज्या बातम्या