ओएलएक्सवर गाडी घेण्याचा मोह नेव्ही अधिकाऱ्याला पडला भारी

गाडी एअरपोर्टच्या पार्कींगमध्ये अनेक दिवसांपासून उभी असून पार्किंग चार्ज १ लाख ७ हजार रुपये झाला आहे. हे पैसे दिले तरच एअरपोर्ट अॅथोरिटी ती गाडी बाहेर काढून देतील. त्याने यादव यांना बँक आॅफ बडोदाच्या खात्यात १ लाख ७ हजार रुपये जमा करण्यास सांगितलं.

ओएलएक्सवर गाडी घेण्याचा मोह नेव्ही अधिकाऱ्याला पडला भारी
SHARES

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये असलेली कार विकण्याच्या बहाण्याने एका नेव्ही अधिकाऱ्याची अडीच  लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.


ओएलएक्सवर जाहिरात

भारतीय नौदलाच्या आय.एन.एस हमला, मार्वे, मालाड येथे कामाला असलेले रामफल श्रीमोहलर यादव हे सध्या १२ ए, न्यु नेव्ही नगर, डाॅ. होमी भाभा रोड, कुलाबा येथे राहतात. २७ मार्च २०१८ रोजी यादव यांनी ओएलएक्स पोर्टलवर मारूती सुझुकी स्विप्ट - VXI क्र. MH 01 BY 2907 ही गाडी दिपक सी. देसाई यांनी ३ लाख २० हजार रूपयांना विक्रीसाठी ठेवली असल्याची जाहीरात पाहिली. यादव यांनी जाहीरातीखाली नमुद केलेल्या नंबरवर फोन केला. त्यावेळी समोरून माथुर नावाच्या व्यक्तीने कारचा व्यवहार अडीच लाख रुपयांमध्ये ठरवला. माथुर या व्यक्तीने यादव यांना कार बघण्यासाठी सांताक्रुझ येथील विमानतळावर टर्मिनल २ येथे बोलावले. ठरल्याप्रमाणे सकाळी १०  वाजता यादव हे टर्मिनल २ येथे गेले. 


पार्किंग चार्जचा बहाणा

यादव यांनी माथूर यांना फोन केला असता त्यांनी त्यांचे ड्रायव्हर उनीअप्पा यांचा नंबर देऊन त्याच्याशी बोलून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे यादव यांनी उनीअप्पा यास काॅल केला असता उनीअप्पा याने यांना सांगितलं की,  सदरची गाडी एअरपोर्टच्या पार्कींगमध्ये अनेक दिवसांपासून उभी असून पार्किंग चार्ज १ लाख ७ हजार रुपये झाला आहे. हे पैसे दिले तरच एअरपोर्ट अॅथोरिटी ती गाडी बाहेर काढून देतील. त्याने यादव यांना बँक आँफ बडोदाच्या दिलेल्या खात्यात १ लाख ७ हजार रुपये जमा करण्यास सांगितलं. त्यानुसार यादव यांनी पैसे भरले. मात्र, पैसे अद्याप खात्यावर जमा झाले नसल्याचे कारण देत उनिअप्पाने दुसऱ्या दिवशी सकाळी ८वाजताच्या  सुमारास यादव यांना एअरपोर्टच्या टर्मिनल २ वर बोलवले.


फोन बंद

दुसऱ्या दिवशी यादव यांनी उनीअप्प्पा यास काॅल केला असता, त्याने गाडीचे  ९६ हजार रुपये इतका कर देणे बाकी असून कर  भरल्याशिवाय गाडी एअरपोर्टमधून बाहेर काढता येणार नाही असं सांगत यादव यांना युनियन बँक आँफ इंडियाच्या खात्यामध्ये ९६ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार यादव यांनी २९ मार्च २०१८ रोजी एनईएफटीद्वारे पैसे भरले. उनिअप्पा याने यादव यांना तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता एअरपोर्टच्या टर्मिनल २ वर येऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले.  त्यानुसार यादव हे गाडी घेण्यासाठी तिसऱ्या दिवशी पोहचल्यानंतर त्यांनी उनिअप्प्पा याला फोन केला. त्यावेळी त्याचा फोन बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी कफ परेड पोलिसात लेखी तक्रार नोंदवली. पोलिसांनी यादव यांचा गुन्हा नोंदवून घेत आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले.



हेही वाचा  -

आदित्य पांचोलीवर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल

लोकलच्या दरवाजात मोबाइलवर बोलणं भोवलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा