भाजपा नगरसेविकेने महापालिका अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावली, नगरसेविकेने आरोप फेटाळले


भाजपा नगरसेविकेने महापालिका अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावली, नगरसेविकेने आरोप फेटाळले
नगरसेवक कृष्णवेनी रेड्डी
SHARES

मुंबईतील वडाळा परिसरातील नालेसफाईच्या कामाची देखरेख करणाऱ्या मुंबई महापालिका अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक भाजपा नगरसेविका कृष्णवेनी रेड्डी यांनी मारहाण केल्याचा आरोप महापालिका अधिकारी योगेश कोठड यांनी केला आहे. परंतु नगरसेविकेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.    

ही घटना गुरूवारी सकाळी वडाळ्यातील विजय नगर रोड इथं झाली. यावेळेस कोठड आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते. एवढ्यात कृष्णवेनी यांनी कोठड यांच्याशी साफसफाईच्या कामावरून आधी वाद घातला आणि नंतर कानशीलात लगावली, असा आरोपी कोठड यांनी केला. तर विजय नगर रोड परिसरातील नालेसफाईचं काम उशीरा सुरू झाल्याने परिसरात पाणी तुंबत असल्याचं कृष्णवेनी यांनी सांगितलं.   

नालेसफाईच्या कामाबद्दल विचारणा केल्यावर हे काम दिवसभरात पूर्ण होईल, असं आश्वासन कृष्णवेनी यांनी दिल्याची माहितीही कोठड यांनी दिली. 

यासंदर्भात वडाळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रेड्डी यांच्या विरोधात आयपीसी कलम ३५३, ३३२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हेही वाचा-

मुंबईत पुढच्या ४ तासांत पावसाचा जोर वाढणार, तिन्ही मार्गावरील लोकलसेवेचा खोळंबा

१०० दिवसांत वाहतूक सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन, प्रवासी संघटनांचा रेल्वेला इशारासंबंधित विषय